छत्रपती संभाजीनगर * दैनिक मराठी * वर्ष - १५ वे

Date

IIT बाबाचं अंधाऱ्या रात्री गंगेच्या किनारी तंत्रमंत्र?; ‘त्या’ सीक्रेट डायरीचं उलगडलं रहस्य

अध्यात्म
कुंभमेळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या IIT बाबाने रात्री उशीरा संगमाच्या काठावर बसून तंत्र मंत्र करताना दिसले. त्यात त्यांनी कर्म आणि प्रारब्धापासून मोह आणि भ्रम, तसेच पुनर्जन्म आणि मुक्ती अशा विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी त्याच्या डायरीबद्दल सांगितले.

प्रयागराज मधील सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात अनेक साधू बाबा खूप चर्चेत आहेत. त्यातीलच या कुंभमेळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आयआयटी बाबाचे निश्चित ठिकाण नाही. जुना आखाड्यातून हकालपट्टी झाल्यानंतर प्रत्येक वेळी ते नव्या ठिकाणी सापडतात. यावेळी अभय सिंह नावाने ओळखले जाणारे आयआयटी बाबा रात्री उशीरापर्यंत गंगेच्या संगमाजवळ अनुष्ठान पुजा करताना दिसले. यावेळी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना एवढ्या रात्री या संगमाजवळ साधना करताना भक्तीचा कोणता मार्ग शोधतात हे सांगितले असून त्यांनी यावेळी त्यांच्या डायरीतील गुपित देखील उघडलं आहे.संगमाजवळ रात्री उपासना करताना दिसले IIT बाबा कुंभमेळ्यात IIT बाबा यांची प्रचंड चर्चा सुरु आहे. अशातच त्यांना रात्री उशिरापर्यंत उपासना आणि साधना करताना दिसले आहे. तर यावेळी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, एवढ्या रात्री उपासना करणे ही एक संतुलित ऊर्जा आहे, विश्वाचा समतोल आहे. ज्यात उपासना साधना करताना तयार होणारी ऊर्जा ही विश्वाच्या वर जाण्यासाठी आणि एक खाली जाण्यासाठी असते. जर मी यातून विश्वाशी ताळमेळ साधला तर विश्वाची ऊर्जाही जुळून येईल. अशातच नवीन काही शिकण्यासाठी येथे आल्याचे त्यांनी सांगितले असून आयुष्याचे सत्य जाणून घेण्यासाठी याचा अभ्यास करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

प्रकाशवार्ता · 23-01-2025 · 5:24 PM

Popular News