छत्रपती संभाजीनगर * दैनिक मराठी * वर्ष - १५ वे

Date

Som Pradosh Vrat: सोम प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा कशी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

अध्यात्म
Mahadev Pooja: प्रत्येक महिन्यातील त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते. प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी महादेवाची पूजा केली जाते. महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया सोम प्रदोष दिवसाचा शुभ मुहूर्त आणि महादेवाची पूजा कशी करावी.

जेव्हा प्रदोष व्रत सोमवारच्या दिवशी येते त्याला सोम प्रदोष व्रत म्हटले जाते. प्रत्येक महिन्यातील त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते. यंदाचे प्रदोष व्रत सोमवारी येत असल्यामुळे त्याला सोम प्रदोष व्रत म्हटले जाते. एका महिन्यामध्ये दोन प्रदोष व्रत असतात, पहिले कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरं शुक्ल पक्षात आहे. यावेळी माघ महिन्याचा कृष्ण पक्ष सुरू आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी संघ्याकाळी शंकराची पूजा केली जाते. महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होण्यास मदत होते. महादेवाची पूजा नियमित केल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते.सोमवारचा दिवस महादेवाला समर्पित आहे. सोमवारी महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील सर्व संकट दूर होतात त्यासोबतच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. महादेवाला देवांचे देव म्हटले जाते. आता अनेकांना प्रश्न पडतो की यंदाचा सोम प्रदोष व्रत नेमकं कधी आहे? आणि सोम प्रदोष व्रताला महादेवाची पूजा कशी आणि कोणत्या शुभ मुहूर्तावर होणार?

प्रकाशवार्ता · 23-01-2025 · 5:22 PM

Popular News