छत्रपती संभाजीनगर * दैनिक मराठी * वर्ष - १५ वे

Date

आज मुंबईत होणार भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5वा T20 सामना. अर्शदीप की हार्दिक? आज कोणाला मिळणार विश्रांती?

क्रीडा
IND vs ENG: आजच्या मॅचमध्ये विजय मिळवून टीम इंडियाचा चौकार मारण्याचा उद्देश असेल. इंग्लंडसमोर टीम इंडियाच्या बॅटर्सला रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

IND vs ENG 5th T20 Playing 11: आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवी आणि अंतिम टी-20 मॅच रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात टीम इंडिया आता 3-1 अशी आघाडी घेऊन सीरिजमध्ये विजयाच्या जवळ आहे. इंग्लंडला यापूर्वी एकच मॅच जिंकता आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. आजच्या मॅचमध्ये विजय मिळवून टीम इंडियाचा विजयी चौकार मारण्याचा निर्धार असेल. इंग्लंडसमोर टीम इंडियाच्या बॅटर्सला रोखणे एक मोठं आव्हान असणार आहे. ठराविक खेळाडूंनी दाखवलेली उत्कृष्ट कामगिरी टीम इंडियाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, काही ठराविक खेळाडूंनी विजयात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. सलामीवीर संजू सॅमसनचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेची बाब बनला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव पहिल्या चार मॅचमध्ये फ्लॉप ठरला असून, त्याला मोठ्या खेळीमध्ये अपयश आलं आहे. टीम इंडियाच्या बॉलिंगवर बोलायचं तर, वरुण चक्रवर्तीच्या फिरकीसमोर इंग्लंडचे बॅटर्स चाचपडताना दिसले. हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, आणि अक्सर पटेल मोक्याच्या क्षणी विकेट्स घेऊन इंग्लंडला सतावत आहेत.

मुंबई

प्रकाशवार्ता · 02-02-2025 · 3:38 PM

Popular News