अर्थसंकल्प 2025 मध्ये संरक्षण क्षेत्रासाठी अनेक सकारात्मक ट्रिगर आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (BEL) शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला तज्ज्ञ देत आहे. टाटा पॉवरचा शेअर देखील खरेदी करण्याचं अनेक तज्ज्ञ सुचवत आहेत. याचविषयी जाणून घेऊया.
शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड असून या काळात गुंतवणूकदार शेअर्सची खरेदी-विक्री करत असतात. आज शेअर बाजाराचा निफ्टी 320 अंकांच्या घसरणीनंतर 23025 च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स 1235 अंकांनी घसरून 75838 च्या पातळीवर बंद झाला. दरम्यान, गुंतवणूकदारांचे सुमारे 7 लाख कोटींचे नुकसान झाले.अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचा सल्ला काय आहे? अर्थसंकल्पापूर्वी मार्केट एक्सपर्ट काही शेअर्सची नावे सांगितली आहेत ज्यात तुम्ही बजेट 2025 पूर्वी गुंतवणूक करू शकता. चला जाणून घेऊया.
संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करावी का?
अर्थसंकल्प 2025 मध्ये संरक्षण क्षेत्रासाठी अनेक सकारात्मक ट्रिगर आहेत. संरक्षण क्षेत्रासाठी मोठी तरतूद होईल आणि निर्यातीसाठीही उत्साह निर्माण होईल, अशी आशा तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. ‘बीईएल’ ही संरक्षण क्षेत्रातील चांगली कंपनी असून, थोडी घसरण झाल्यानंतर ही चांगली संधी आहे, असं मत तज्ज्ञांचं आहे.
प्रकाशवार्ता ·
23-01-2025
·
5:17 PM